Posts

धक्कादायक ! मनसेतून शिंदे गटात आलेल्या नेत्याच्या पत्नीची आत्महत्या, विष घेतलं; कारण काय?

Image
मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनसेतून शिंदे गटात आलेले निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. पुण्यात राहत्या घरी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळतं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शिंदे गटाचे बाळासाहेबांची शिवसेना माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका काय होता हे अजून कळलेलं नाही. अंतर्गत

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये कृषी निधीसाठी 2,200 कोटींची तरतूद ,असा घेता येईल लाभ !

Image
कृषी निधीमध्ये एकूण 2,200 कोटींचे वाटप केले जाईल आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि शेतीतील नाविन्यपूर्ण पद्धतींना चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कृषी उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी सरकारला आशा आहे. डिजिटल शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सना आवश्यक सहाय्य प्रदान करण्याच्या दिशेने सरकारचे हे एक मोठे पाऊल आहे. कृषी निधी शेतकऱ्यांना अचूक शेती, बिग डेटा अॅनालिटिक्स आणि कृषी व्यवसायासाठी डिजिटल उपाय यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात मदत करेल. या व्यतिरिक्त, सरकारने ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि राष्ट्रीय शीत साखळीच्या निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासह कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी अनेक उपक्रम जाहीर केले आहेत. सरकार कृषी उत्पादनांसाठी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करत आहे. कृषी निधीसाठी 2,200 कोटींचे वाटप हे देशातील कृषी विकासाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांचे ज

ठाण्यातील राजकीय संघर्षाला ठाकरे-आव्हाडांची जवळीक कारणीभूत ठरली का ?

Image
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याप्रमाणेच ठाण्यातील शिवसेना दुभंगली. ठाण्यात शिंदे आणि ठाकरे असा राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असला तरी गेल्या काही दिवसांपासून त्यास शिंदे-ठाकरे आणि आव्हाड असे तिहेरी स्वरूप येताना दिसत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात उद्धव सेनेचा चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर खासदार राजन विचारे यांच्या रूपाने काही प्रमाणात ‘मातोश्री’ला गवसले असले तरी ठाकरे-शिंदे लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावत उडी घेतल्याने राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. शिंदे-आव्हाड समन्वयाच्या राजकारणाला तडा कोणामुळे? ठाणे शहर हे राजकीय समन्वयाच्या आणि त्यातून केल्या जाणाऱ्या हातमिळवणीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध होते. या शहरात सत्ता कुणाचाही असो, बिल्डर, ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी आणि ठराविक नेत्यांची राजकीय युती नेहमीच चर्चेत राहिली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्येही समन्वयाचे राजकारण अनेकदा पाहायला मिळाले. ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर नेहमीच शिवसेना आणि भाजपचा वरचष्मा पाहायला मिळाला. मा

आदिवासी तरुणांसाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र

पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना रोजगार व उद्योजकता क्षेत्रात काम करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पालघर केंद्रात एकूण ३९ व्हिटीपी कार्यरत आहेत. त्यापैकी १० व्हिटीपीमध्ये प्रशिक्षण सुरु आहे. तसेच एकूण ३३ बॅचेस सुरु असून त्यामध्ये ९२३ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४२ बॅचमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये ८५७ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत. तसेच ॲसेसमेंट पूर्ण झालेल्या एकूण बॅचेसची संख्या २७ असून विद्यार्थ्यांची संख्या ४९३ इतकी आहे. पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग केंद्रित प्रशिक्षण देणाऱ्या एकूण सात कंपन्यानी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी सोबत सामंजस्य करार करुन ९०२० बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध केला जाणार आहेत. त्यामध्ये एकूण ५९५ पेक्षा अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे. या कार्यालयामार्फत चार रोजगार मेळावे घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बेरोजगार उमेदवार तसेच उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या

गांधी-आंबेडकर वारसा समजून घेताना

Image
महात्मा गांधी भारतातील सर्वच जाती धर्माने पंथांनी स्वीकारलेला त्याच बरोबर सर्वाधिक टीका झालेला महान व्यक्ती. गांधींवर आज पर्यंत जगभरात लाखाहून अधिक पुस्तके लिहिली गेली. तसेच त्यांच्यावर अनेक आरोपही झाले. मृत्यूच्या सत्तर वर्षांनंतरही ते होतच असतात. त्यातील एक म्हणजे गांधी जातीयवादी, वर्णव्यवस्था मानणारे होते. अलीकडेच गांधी विरोधकच नव्हे तर काही डाव्या विचारवंतांनी देखील गांधींवर असे आरोप केले होते हे आरोप अर्धसत्य ठरतात हे मात्र निश्चित. गांधीशी सार्वजनिक जीवनाच्या सुरुवातीला चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते हे सत्य असले तरी शेवटपर्यंत ते याच मतावर कायम राहिले असे नाही जातीय व्यवस्थेचे नंतर ते प्रखर टीकाकार बनले सामाजिक समतेसाठी कायम प्रयत्नशील राहिले 1918 साली महात्मा गांधी जाहीरपणे म्हणतात या देशाच्या सर्वोच्चपदी भग्याची वा चांभाराची मुलगी असणं हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे. नागपूरच्या 1920 च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव ते स्वतः मांडतात येरवडा तुरुंगातून सुटल्यावर गांधींनी साडेबारा हजार मैलाची हरिजन यात्रा काढली होती याच यात्रेदरम्यान त्

असा घडला आपला भारत...

आज आपण भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, एक मोठ्या जन चळवळीतून आपण हे अमुल्य स्वतंत्र मिळविले आहे. जगभरामध्ये अमेरिकन स्वतंत्र चळवळ, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती यासोबतच भारतीय स्वातंत्र्यलढा देखील आवर्जून अभ्यासावा असाच आहे. भारत हे एक राष्ट्र बनवून ७४ वर्षाचा काळ लोटला आहे , परंतु आज घडीला आपण या विषयी विचार करायला हवा की भारताची राष्ट्र बनण्याची प्रक्रिया नेमकी कशी घडली. अशी कोणती मुल्ये होती ज्यामुळे सर्व भारतीय एकत्र येऊ शकले? अशा कोणत्या घटना होत्या ज्यामुळे पंजाब पासून तर कन्याकुमारी पर्यंत सांस्कृतिक वैविध्य असलेले जनता भारतीय म्हणून इंग्रजांविरुद्ध एकदिलाने लढली? राष्ट्र संकल्पनेचा उगम आणि विकास  राष्ट्र-राज्य (Nation State) संकल्पना सर्वप्रथम युरोपात उदयास आली .भाषिक आणि धार्मिक आधारावर देश निर्माण झाले. जवळपास संपूर्ण युरोपात ख्रिश्चन हाच धर्म होता तर जर्मन, फ्रेंच, इटालियन अशा भाषा . थोडक्यात युरोपात राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सुलभ होती असे म्हणता येईल . सेव्हिएट युनियनच्या विघटनासोबत अनेक देश नव्याने उदयास आले. भारताच्या राष्ट्रनिर्मितीसाठी

जागतिकीकरणाचा भारतावर झालेला परिणाम

कालपरवाच आपण देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी 2020 साली भारताला महासत्ता बनविण्याचे ध्येय देशासमोर ठेवले होते आज घडीला आपण महासत्ता नसलो आणि पुढील दशक- दोन दशक तसे होण्याची शक्यता नसली तरी आजपर्यंत झालेल्या आर्थिक प्रगतीचे अवलोकन करणे योग्य ठरेल. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण अर्थव्यवस्थेचे नेहरू प्रणित समाजवादी मॉडेल स्वीकारले होते. त्यावेळी रशियन साम्यवादाचा ‘नेहरुं’वर प्रभाव पडलेला होता. अनेक क्षेत्रात त्यामुळे सरकारने गुंतवणूक केली मोठे मोठे कारखाने उभे राहिले. दरम्यानच्या काळात मात्र अर्थव्यवस्थेची जोमाने वाढ झाली असे म्हणता येणार नाही. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ३.० ते ३.५ टक्क्यांच्या दराने वाढत होती त्या वाढीला उपहासाने हिंदू ग्रोथ रेट ऑफ इकॉनोमी असे म्हटले जात असे. अगदी अलीकडे 1991-92 पर्यंत भारतात समाजवादी अर्थव्यवस्थाच होती. परंतु 1991-92 मध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी भारताने ‘जागतिकीकरणा’चा स्वीकार केला. ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने तशी अट वजा विनंतीच केली होती. अर्थव्यवस्थेतील हे बदल तत्कालीन